पूर्व आशियाई देशात मश्रुमचा वापर सर्वाधिक आहे. मुख्य म्हणजे ही फळभाजी पूर्णपणे सेंद्रीय आहे. रासायनिक पदार्थाचा वापरच होत नाही, त्यामुळे ती भेसळ करून बनवता येत नाही. यात असणारे प्रोटीन हे प्राथमिक दर्जाचे आहे, म्हणजे शरीरास जसे हवे तसे ते आहे. डाळ, बदाम यातही प्रोटीनचे प्रमाण अधिक असले तरी ते दुय्यम दर्जाचे आहे. मशरूमचा वापर ज्या देशात मोठय़ा प्रमाणावर होतो तेथे दरडोई वर्षांला ७० किलोपर्यंत त्याचा वापर होतो. भारतात हे प्रमाण केवळ अर्धा किलो इतके आहे. उच्चभ्रू लोकच याचा वापर करतात. उत्तरेप्रमाणेच तामिळनाडू, कर्नाटक या परिसरातही मशरूमचे उत्पादन घेतले जाते. लग्नसमारंभात या भाजीला मानाचे स्थान आहे. प्रोटीन शरीरात घेण्यासाठी मटन, मासे, दूध, सोयाबीन याचा वापर होतो मात्र शून्य कोलेस्टेरॉल असणारा एकमेव पदार्थ म्हणून मशरूमची ओळख आहे.
Mushroom Training Center Latur
Mushroom spawn supplier latur | Mushroom training latur | mushroom company latur