मश्रूम म्हणजे काय असते?
मशरूमला मराठीत ‘अळिंबी’ म्हटले जाते. पावसाळ्यात येणारी ही वनस्पती आहे. बुरशी गटात ती मोडते. ग्रामीण भागात कुत्र्याची छत्री, भूछत्र, तेकोडे, धिंगरी, सात्या, डुंबरसात्या, केकोळ्या या नावांनी ती ओळखली जाते. जगभरात मशरूमच्या १२ हजारांहून अधिक जाती आहेत. मशरूमची प्रामुख्याने पूर्व आशिया, तैवान, इंडोनेशिया, कोरिया, चीन या देशांत लागवड केली जाते. सर्वात जास्त मशरूम जर्मनीमध्ये खाल्ले जाते.
त्यासाठी काय काय लागते?
मशरूमची व्यावसायिक शेती म्हणजे शेतकर्यांसाठी एक प्रकारचे वरदान आहे. मशरूमच्या उत्पादनासाठी शेतातील टाकाऊ गोष्टींचा वापर केला जाऊ शकतो. उदा. उसाची वाळलेली पाने, केळीची पाने व बुंधा, कापसाची वाळलेली झाडे, सोयाबीनचा कुटार, मक्याची व ज्वारीची धाटे अशा साधनांचा वापर करता येतो.
शिंपला किवा धिंगरी मश्रूम काय असते?
नैसर्गिक वातावरणात या मशरूमची लागवड केली जाते. संपूर्ण भारतभर शिंपला मशरूमचे उत्पादन होते. धिंगरी मशरूमची लागवड बटन मशरूमपेक्षा अल्प खर्चीक आहे. मशरूम लागवडीसाठी जागा, पाणी, कच्चा माल, प्लॅस्टिक, बियाणी, वातावरण, यंत्रसामग्री आदी महत्त्वाच्या गोष्टी आहेत.
मशरूमचे औषधी गुणधर्म : १) मशरूममध्ये जास्त प्रथिने व कमी ऊर्जा आहे. त्यामुळे मधुमेहींना ते उपयुक्त आहे. २) किडनीच्या रोगांवर उपयोगी ३) लठ्ठ व्यक्तींसाठी उत्तम आहार ४) पचनक्रिया सुरळीत होण्यासाठी मदत करते.
मशरूमचे औषधी गुणधर्म : १) मशरूममध्ये जास्त प्रथिने व कमी ऊर्जा आहे. त्यामुळे मधुमेहींना ते उपयुक्त आहे. २) किडनीच्या रोगांवर उपयोगी ३) लठ्ठ व्यक्तींसाठी उत्तम आहार ४) पचनक्रिया सुरळीत होण्यासाठी मदत करते.
मश्रूमपासून काय काय बनवता येते?
मशरूमपासून लोणची, पापड, सूप पावडर, हेल्थ पावडर, कॅप्सूल्स, हेल्थ ड्रिंक्स इत्यादी उत्पादनेही बनविली जातात. या उत्पादनांनाही चांगली बाजारपेठ उपलब्ध होऊ शकते.
मश्रूमशेतीचा फायदा काय आहे?
आपल्या देशात गरजेच्या तुलनेत मशरूमचे उत्पादन अत्यल्प होते. लोकांमध्ये आजाराविषयी जागरूकता वाढली आहे. त्यामुळे आजाराला दूर ठेवणारे पदार्थ खाण्याकडे त्यांचा कल वाढतो आहे. त्यामुळे या क्षेत्रात नव्याने उतरणार्यांसाठी मोठ्या संधी उपलब्ध आहेत. केंद्र शासनाकडून तीस लाखांचे अनुदानही मिळते. व्यावसायिक शेती करू इच्छिणारे अथवा पारंपरिक शेती करणारे शेतकरीही या संधीचा फायदा घेऊ शकतात.
· मशरूम प्रशिक्षण, मशरूम बियाणे आणि मूल्यवर्धित मशरूम पदार्थ उत्पादन आणि मशरूम मार्केटिंग सारख्या इतर माहितीसाठी आमच्याशी संपर्क साधा.
· मशरूम लर्निंग सेंटर, जयसिंगपूर-कोल्हापूर
· फोनः 9923806933